आपला जिल्हामहाराष्ट्र
भुमी अभिलेख कार्यालयात मनमानी कराभार व सतत कर्मचारी अधिकारी राहतात गैरहजर. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा अन्यथा टाळ ठोकु – भाई मोहन गुंड
केज ( प्रतिनिधी ) केज येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयामध्ये शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केली जात आहे. कार्यालयातील कर्मचारी अधिकारी सातत्याने गैरहजर असतात. दोन ठिकाणचा चार्ज असल्याचे कारण दाखवत कार्यालयात उपअधिक्षक उपस्थित रहात नसल्यामुळे अनेक कामं रखडले आहेत, अशी तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी वरिष्ठाकडे केली आहे. पेरणीचे दिवस असल्याने नंबर बांध, नकाशे, मोजणी, हाद्द कायम करणे, गुंटेवारी. इत्यादी शेतकऱ्यांचे कामे गेली सहा सहा महिन्यापासून रखडले आहेत. एका कामासाठी शेतकऱ्यांना वारोवार चकरा माराव्या लागतात, खाजगी दलाला मार्फत काम तात्काळ होत, वरील विषयाची चौकशी करून सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा केज उपविभागीय भूमि अभिलेख कार्यालयाला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दि २० मे रोजी कुलुप ठोकण्यात येईल आसे जिल्हा अधिकारी कार्यालय बीड, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय बीड, दिलेल्या निवेदनात भाई मोहन गुंड, ॲड निखिल बचुटे, पप्पु भोसले, आप्पा गवळी, दशरथ आकुसकर, नसरीन बागवान यांनी दिला आहे.
