आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

“रुग्णालयात पाण्याचा तुटवडा व अस्वच्छ शौचालय; समाजवादी पक्षाचा इशारा – आंदोलनाची तयारी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली असून सुलभ शौचालये व मुतारींमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव अॅड. शिवाजी कांबळे, शहराध्यक्ष राजेश परदेशी यांच्यासह पदाधिकारी रुग्णालयाच्या पाहणीस आले असता ही गंभीर परिस्थिती उघड झाली. रुग्ण व नातेवाईकांना उपहारगृहाजवळ पाणी उपलब्ध नव्हते, मेडिकल शेजारील रोटरीचे पाण्याचे ठिकाण बंद होते तसेच रुग्णालयाच्या आवारातील शेडलगतची पाण्याची व्यवस्था देखील कोरडी पडलेली आढळली. त्याहून गंभीर म्हणजे नातेवाईकांसाठी असलेली पुरुष मुतारी व सुलभ शौचालय पूर्णपणे अस्वच्छ व दुर्गंधीने भरलेली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. “रुग्णालयातील मूलभूत सुविधा तातडीने सुरळीत कराव्यात, अन्यथा समाजवादी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल,” असा इशारा अॅड. कांबळे यांनी दिला आहे. या पाहणीदरम्यान महिला जिल्हाध्यक्ष सालेहा जुलानी शेख, केज विधानसभा अध्यक्ष शेख शौकत, तालुकाध्यक्ष जुलानी शेख, शहर उपाध्यक्ष शेख शाकीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!