ताज्या घडामोडी

बीड जिल्हा युवा महोत्सवात तुलसी महाविद्यालयाचे यश; तीन प्रमुख कला प्रकारांत पटकावली पारितोषिके

बीड (प्रतिनिधी) : अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बीड जिल्हा युवा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करत तीन प्रमुख कला प्रकारांत पारितोषिके पटकावली. या यशामुळे महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने शिरसाळा येथील पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालयात दि. ४ व ५ सप्टेंबर रोजी बीड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस रंगलेल्या या महोत्सवात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील युवा कलावंतांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. महोत्सवातील विविध चुरशीच्या स्पर्धांमध्ये तुलसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने विशेष छाप पाडली. मूक अभिनय स्पर्धेत महाविद्यालयाच्या संघाने प्रभावी अभिनयाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. मिमिक्री स्पर्धेत रोहित गव्हाणे याने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने द्वितीय क्रमांक मिळवला. तर वाद-विवाद स्पर्धेत आदित्य ठोंबरे आणि रोहित गव्हाणे यांनी अभ्यासपूर्ण व मुद्देसूद मांडणी करत तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डी. जी. निकाळजे आणि सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. विवेक जोगदंड यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!