ताज्या घडामोडी

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! कै.केरबा आण्णा कै.रघुनाथ दादा. गावकऱ्यांनी परत आठवणी जाण्या केल्या.

बैलपोळा… हा केवळ सण नाही, तर शेतकरी आणि त्याच्या बैलांमधील जिव्हाळ्याच्या नात्याचा दिवस आहे. होळ गावामध्ये बैलपोळ्याच्या खांदा मळणीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या घरी खांदा मळणीसाठी लागणारा मोळ देण्याची एक परंपरा माझे आजोबा कै.केरबा आण्णा शिंदे व कै.रघुनाथ दादा शिंदे यांनी अनेक वर्षे जपली. दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन प्रेमाने मोळ देण्याची ही जबाबदारी त्यांनी अत्यंत आपुलकीने पार पाडली. आजोबांच्या निधनानंतर ही परंपरा माझे वडील कै. रघुनाथ दादा शिंदे यांनी पुढे चालवली. काही वर्षे त्यांनीही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जाऊन हा मोळ पोहोचवला. मात्र यावर्षी परिस्थिती वेगळी होती… काल बैलपोळ्याच्या दिवशी गावातील शंभरपेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी मला फोन करून एकच प्रश्न विचारला— “यावर्षी मोळ येणार नाही का?” या एका प्रश्नामध्ये माझ्या आजोबांवर आणि वडिलांवर गावकऱ्यांचे किती प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आहे, हे पुन्हा एकदा जाणवले. फोनवरून अनेकांनी आजोबांच्या आठवणी सांगितल्या… काहींनी त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. त्या क्षणी मन भरून आले. आजोबा आणि वडील आज आपल्यात नाहीत; पण त्यांनी शेतकऱ्यांसोबत निर्माण केलेले नाते, प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणे जपलेली परंपरा आजही गावकऱ्यांच्या मनात जिवंत आहे, याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. गावातील प्रत्येक शेतकरी बांधवांनी काल फोन करून माझ्या आजोबांची आणि वडिलांची आठवण करून दिली, त्याबद्दल मनःपूर्वक आभार. ❤️ आजोबांनी सुरू केलेली आणि वडिलांनी पुढे नेलेली ही परंपरा आता पुढे नेण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या काळात होळ गावातील कोणत्याही शेतकरी बांधवाला बैलपोळ्याच्या सणासाठी मोळाची कमतरता भासू देणार नाही, ही माझी मनापासूनची भावना आहे. पुढील वर्षीच्या बैलपोळ्यापासून मी स्वतः या परंपरेत सहभागी होऊन आजोबा आणि वडिलांची आठवण जपत हा जिव्हाळ्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करतो. कारण काही परंपरा फक्त चालत नाहीत… त्या माणसांच्या प्रेमामुळे जिवंत राहतात. माझ्या आजोबांवर आणि वडिलांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्या आठवणी आजही मनात जपणाऱ्या होळ गावातील सर्व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक धन्यवाद! 🙏❤️ आजोबा-वडील आमच्यात नसले तरी त्यांनी केलेले काम, त्यांची इमानदारी आणि शेतकऱ्यांशी असलेले नाते हेच आमच्यासाठी त्यांचे खरे स्मारक आहे. 🐂🌾 पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🐂 – उत्तरेश्वर शिंदे होळ

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!