ताज्या घडामोडी
अंबाजोगाई शहर पोलीसांची वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर विशेष कारवाई
भरारी न्युज अंबाजोगाई... आज सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ७.१५ ते रात्री ९.०० वाजेपर्यंत तथागत चौक, बसस्थानक परिसरात विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वारंवार सूचना देऊनही तथागत चौकातील हॉटेलसमोर रस्त्यावर अव्यवस्थित पार्किंग करण्यात आलेली आढळून आल्याने एकूण ३० वाहने पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक श्री. शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, रमेश घुले, रमेश सानप, भागवत कांदे तसेच पोलीस अमलदार मंगेश भोळे, श्रीकृष्ण वडकर, भगवान नागरगोजे, बिभीषण मुंडे, अनिल डोंगरे, निलेश भोसले, तेजस वावळे, हनुमंत लाड, त्र्यंबक फड, अजय गडदे, सुशांत गायकवाड, संदीप मुंडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब पारवे, व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. ही विशेष कारवाई शहरातील विविध भागांमध्ये दररोज बदलत्या ठिकाणी सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले की, खरेदीसाठी अथवा हॉटेलमध्ये जाताना आपली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी न करता नियोजित ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने पार्क करावीत. तसेच हॉटेल चालक व इतर व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनासमोर ग्राहकांची वाहने शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.




