ताज्या घडामोडी

श्री होळेश्वर विद्यालयात वै. नारायण दादा काळदाते यांची जयंती व सौ. विश्वेकर मॅडम यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

होळ (प्रतिनिधी): श्री बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा संचलित श्री होळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, होळ येथे संस्थेचे प्रेरणास्थान वै. परमपूज्य नारायण दादा काळदाते यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच विद्यालयातील ज्येष्ठ व आदर्श शिक्षिका सौ. विश्वेकर मॅडम यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. भागवतदादा गोरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे, उपाध्यक्ष मा. अनिल कुलकर्णी, केज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. सुनिल केंद्रे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मा. नेताजी पापा शिंदे, होळचे माजी सरपंच मा. लक्ष्मण तात्या राख, केंद्रप्रमुख श्री थोरात सर, माजी केंद्रीय मुख्याध्यापक मिटकरी साहेब, माजी मुख्याध्यापक एस. एन. जाधव सर, हंडीबाग सर, राख सर, शिंदे सर यांच्यासह विश्वेकर मॅडम यांचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वै. नारायण दादा काळदाते यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर बालासाहेब खोगरे सर यांनी नारायण दादा काळदाते यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांनी दादांचे व्यक्तिमत्त्व, शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रेरणादायी जीवनशैली याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना डॉ. नरेंद्र काळे यांनी सांगितले की, “नारायण दादा काळदाते यांचे खरे वारसदार हे या संस्थेतील शिक्षक आहेत. कारण दादांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य शिक्षक करत आहेत. आम्ही रक्ताचे वारसदार असलो तरी विचारांचे वारसदार हे शिक्षकच आहेत.” गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे यांनी आपल्या मनोगतात सौ. विश्वेकर मॅडम आणि मिटकरी सर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी विश्वेकर मॅडम या विद्यार्थीप्रिय, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष शिक्षिका असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच केंद्रे मॅडम यांनी आपल्या भाषणात विश्वेकर मॅडम यांच्या सहकार्यशील स्वभावाचा उल्लेख केला. सहकाऱ्यांना समजून घेणे, सर्वांना सोबत घेऊन काम करणे आणि एकोप्याने राहण्याचा संदेश त्यांनी आपल्या कार्यातून दिल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात माजी केंद्रीय मुख्याध्यापक मिटकरी साहेब यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना विश्वेकर मॅडम यांच्या सहवासामुळे आपले आयुष्य अधिक सुखकर व समृद्ध झाल्याचे सांगितले. अनेक वक्त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. निरोप समारंभातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे सौ. विश्वेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यालयाला सुमारे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचा डिजिटल बोर्ड भेट देण्याची घोषणा केली. त्यांच्या या योगदानाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. यावेळी सौ. सरवदे मॅडम यांनी विश्वेकर मॅडम यांचा जीवनपरिचय करून दिला, तर प्रा. गायकवाड मॅडम यांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राठोड सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन जाधव सर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन प्राचार्य देवानंद संभाजीराव मलदोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वै. नारायण दादा काळदाते यांच्या विचारांना अभिवादन करत आणि सौ. विश्वेकर मॅडम यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करत संपन्न झालेला हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!