ताज्या घडामोडी

*कृषि महाविद्यालय पाथरीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन*

भरारी न्युज.9156101056 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत येणाऱ्या येथील कृषि महाविद्यालय, पाथरीच्या वतीने परिसरातील नागरजवळा ता. मानवत जिल्हा परभणी येथील हनुमान मंदीर, सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात सहभागी मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागरजवळा गावचे उपसरपंच श्री नारायण होगे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जी. डी. गडदे, डॉ. राजेश मुळे, डॉ. ए. एन. डांगे, श्री सुशांत सावंत, प्रा. विजय थोरे, प्रा. अमोल लाड, प्रा. तेजस्विनी बेंडे उपस्थित होते तर श्री रुस्तुम होगे, श्री सुरेश देंडगे, श्री गोविंद होगे, श्री गोविंद मसलकर यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी डॉ. जी. डी. गडदे यांनी कापूस, सोयाबीन व हळद पिकातील सद्यस्थितीतील व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. ए. एन. डांगे यांनी जनावरांतील आजार व लसीकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री सुशांत सावंत यांनी पिकातील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन व किटकनाशके फवारताना काय काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली. प्राचार्य डॉ. राजेश मुळे यांनी शेतीपुरक जोडधंद्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. कु. मयुरी वावरे व कु. सारिका गवळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. विजय थोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. अमोल लाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्यवस्थापक श्री माउली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि महाविद्यालय पाथरीच्या अंतिम वर्षातील कृषिदूत, कृषिकन्या व गावातील युवकांनी पुढाकार घेतला

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!