आपला जिल्हामहाराष्ट्र

आईसाहेब रमाई आंबेडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

भरारी न्युज...अंबाजोगाई : २७ : आईसाहेब रमाई आंबेडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमिताने आंबेडकर भवन संघर्षभूमी येथे विचार अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम ॲड शाम तांगडे व डॉ गणेश सुर्यवंशी यांनी आईसाहेबांच्या फोटोस पुष्पहार अर्पण केला. नंतर सामुहीक वंदना घेण्यात आली. डॉ गणेश सुर्यवंशी यांनी आईसाहेब रमाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर भाष्य केले तसेच गीतांतून त्यांना अभिवादन केले. ॲड शाम तांगडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व सारसंकलन संजय हतागळे यांनी केले. तर डॉ किर्तीराज लोणारे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी विश्वानाथ सावंत , सुभाष घाडगे , बलभीम बनसोडे , राणोजी वैद्य , नरसिंग तरकसे , बाबुभाऊ कांबळे आदींची उपस्थिती होती.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!