ताज्या घडामोडी

संगमनेरमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, दोषी डॉक्टरांना तातडीने अटक करण्याची मागणी

भरारी न्युज प्रतिनिधी सचिन सोनवणे 08एप्रिल रोजी सदर निवेदनात विषय: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याबाबत कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झालेल्या ना त्वरित अटकेची कारवाई व इतर मागणी बाबत निवेदन माननीय महोदय, संगमनेर शहर व तालुका शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने आपणास जाहीर निवेदनाद्वारे सुचित करण्यात येते कि मागील वर्षी मार्च २०२५ मध्ये संगमनेर येथील सोनांबेकर हॉस्पिटल येथे दत्तात्रय दळवी हे रुग्ण हृदयरोगाच्या उपचारासाठी दाखल झाले होते. सदर रुग्णावर अँजीओप्लास्टी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रिये दरम्यान व त्यानंतर संबंधित डॉक्टरांकडून गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते. रुग्णाच्या हातावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे गँगरीन झाला. तसेच, पुढील उपचारातही विलंब करण्यात आला. या दरम्यान डॉ. अभिजित कोरडे व डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली व पैसे नसल्यास लोणी येथिल धर्मदाय रुग्णालयात हलवण्यास सांगितले. यानंतर रुग्णास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथील खर्च आवाक्याबाहेर असल्याने त्यांना पुढे घोटी येथील SMBT हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यास सांगितले. नाशिक व घोटी येथील डॉक्टरांकडून अप्रत्यक्षपणे समजले की, सोनांबेकर हॉस्पिटल प्रशासनाकडून उपचारात निष्काळजीपणा झाला होता. पुढील काही दिवसांत रुग्णाच्या किडनीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत गंभीर असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे रुग्णाचा जीव गमवल्यानंतर रुग्णाच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली आहे रुग्णाच्या परिवाराला योग्य तो न्याय दिला पाहिजे जर कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरूनशिवसेना स्टाईल ने मोठं आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी आपली राहील तरी आपणास नम्र विनंती आहे की: 1. संबंधित डॉक्टरांवर कोर्टाच्या आदेशानुसार तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी 2. डॉ. अभिजित कोरडे व डॉ. अजिंक्य सोनांबेकर यांना त्वरित अटक करण्यात यावी. 3. संबंधित डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. 4. सदर प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत डॉक्टर सोनंबेकर यांचे हॉस्पिटल सील करण्यात यावे तसेच संगमनेरचे मुख्य अधिकारी गोरे साहेब यांना देखील डॉक्टर सोनंबेकर यांनी केलेल्या सर्वे नंबर 111/37 मध्ये ओपन स्पेस व रस्त्यात केलेल्या अतिक्रमणावर त्वरित कारवाई करून दंड वसूल करण्याबाबत तसेच ओपन स्पेस स्थानिक नागरिकांसाठी खुला करणे साठी मागणी करण्यात आली आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, ही नम्र विनंती. यावेळी उपजिल्हाप्रमुख,अमरभाऊ कतारी शहरप्रमुख अमित चव्हाण, फैसल सय्यद, जिल्हासंघटक रंगनाथ फंटागरे, तालुकाप्रमुख,भाऊसाहेब हासे,भिमाशंकर पावसे ,पथ विक्रेता सदस्य,दिपक साळुखे युवासेनामाजी शहर प्रमुख रविंद्र कानकाटे विधानसभाप्रमुख,अमोल डुकरे वाहतुक सेना जिल्हाप्रमुख,इम्तियाज शेख , तालुका प्रमुख अशोक बढे,महिला आघाडी तालुकाप्रमुख,शितलताई हासे,तसेच उप तालुका प्रमुख भाऊसाहेब वराळे, परवेझ शेख सदाशिव हासे,योगेश खेमनर प्रकाश गायकवाड असिफ तांबोळी त्रिलोक कतारी देविदास वराडे,रहिम बेग,संभव लोढा, इतर शिवसैनिक उपस्थित होते अनेक पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडीअंगीकृत संघटना पदाधिकारी उपस्थित होते

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!