ताज्या घडामोडी

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे नवीन इमारतीत स्थलांतर

अंबाजोगाई : प्रतिनिधी :--उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अंबाजोगाई हे कार्यालय आता स्वतःच्या मालकीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित होत आहे. लातूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत, स्व. विमलताई मुंदडा आरोग्य संकुल, सेंजारी, मौजे लोखंडी सावरगाव येथे बांधण्यात आलेल्या नवीन कार्यालयीन इमारतीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईचे सर्व कामकाज दि. 06 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. त्यामुळे वाहन नोंदणी, वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), परवाने, कर भरणा तसेच इतर सर्व परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी नागरिकांनी यापुढे लोखंडी सावरगाव येथील नवीन कार्यालयात उपस्थित राहून आपली कामे करून घ्यावीत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई यांनी केले आहे. नवीन कार्यालयीन इमारतीमुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून कामकाज अधिक सुलभ व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पुढील सर्व कामकाजासाठी लोखंडी सावरगाव येथील नवीन कार्यालयाचा उपयोग करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!