ताज्या घडामोडी

श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस १ कोटी ११ लाखांचा नफा – चेअरमन माणिक वडवणकर, व्हाईस चेअरमन मनोज लखेरा यांची माहिती

अंबाजोगाई (प्रतिनिधी) बिना सहकार, नही उद्धार हे ब्रीद घेवून सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार आणि प्रगतीपथावर यशस्वी वाटचाल करणारी, सर्वांना आपली हक्काची अर्थवाहिनी वाटणारी, अंबाजोगाई परिसरातील ग्राहक व सभासदांच्या विश्वास व त्यांच्या पाठबळावरच अल्पावधीतच शहरवासीयांची मिनी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च २०२६ अखेर १ कोटी ११ लाख ३१ हजार ६८९ रूपयांचा नफा झाल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवणकर, उपाध्यक्ष मनोज लाखेरा आणि व्यवस्थापक गजानन कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेवरील ग्राहकांच्या दृढ विश्वासाने ३१ मार्च २०२६ अखेरीस ५५ कोटींच्या ठेवींसह १ कोटी ११ लाख ३१ हजार ६८९ रूपयांचा नफा मिळण्याचे कारण म्हणजे पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि ग्राहक तथा सभासदांचा अतूट विश्वास असून यावरच आज या पतसंस्थेची यशस्वी घोडदौड सुरू असल्याची माहिती चेअरमन माणिक वडवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेची ३१ मार्च २०२६ अखेरची वित्तीय स्थिती पुढीलप्रमाणे मांडली आहे. यामध्ये पतसंस्थेकडे एकूण २२६० सभासद असून, पतसंस्थेचे एकूण भाग भांडवल रूपये २ कोटी ५३ लाख ७८ हजार एवढे आहे. पतसंस्थेचा स्वनिधी हा ९ कोटी रूपये एवढा आहे. पतसंस्थेकडे सभासदांच्या एकूण ठेवी रूपये ५५ कोटी, तर सभासद व ग्राहकांना ३१ मार्च २०२६ अखेर पर्यंत कर्ज वाटप रूपये ४८ कोटी एवढे झाले आहे. तसेच पतसंस्थेची अंबाजोगाई पिपल्स बँक व अन्य ठिकाणची गुंतवणूक ही रूपये २६ कोटी ९८ लाख एवढी असून ३१ मार्च २०२६ अखेर (आर्थिक वर्ष २०२५- २०२६) पतसंस्थेस रूपये १ कोटी ११ लाख ३१ हजार ६८९ रूपयांचा नफा झाला आहे. श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही साधरणतः ३६ वर्षांपूर्वी एका छोट्याशा खोलीत केवळ १० हजार रूपयांच्या गुंतवणुकीवर सुरू करण्यात आली होती. आज सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या अतूट विश्वासाच्या बळावर श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेने रूपये दहा हजारावरून आज रूपये ५५ कोटी ठेवींचा टप्पा गाठला आहे. पतसंस्थेने सातत्याने हजारो छोटे, मोठे व्यावसायिक, हातगाडी, फेरीवाले, भाजीपाला व फळविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढीसाठी मागणीनुसार वेळोवेळी मदत करून त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी भक्कम पाठबळ दिले आहे. तसेच वेळोवेळी सभासदांच्या मुला-मुलींचे शिक्षण, विवाह, घर बांधकाम तसेच नवीन जागा खरेदी करण्यासाठी देखील पतसंस्थेकडून वेळोवेळी आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही वेळोवेळी अर्थार्जनासोबतच अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असते. पतसंस्थेच्या वतीने प्रतिवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शैक्षणिक साहित्याचे वाटप, रूग्णांना फळ वाटप करण्यात येत आहे. अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक म.अंबाजोगाई ही बँक या पतसंस्थेची मातृबँक म्हणून कार्यरत आहे. योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था ही आजच्या घडीला केवळ पतसंस्था राहिली नसून ती एक मिनी बँक म्हणूनच ओळखल्या जाऊ लागली आहे. श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था नांवारूपाला आणण्यासाठी पतसंस्थेचे सर्व ग्राहक, सभासद, ठेवीदार, कर्जदार, खातेदार, जामीनदार आणि हितचिंतक यांच्यासह संस्थापक मार्गदर्शक राजकिशोर मोदी, पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक शेषेराव वडवणकर, उपाध्यक्ष मनोज मोहनलाल लखेरा तसेच संचालक कचरूलाल हिरालाल सारडा, ब्रह्मचारी तुळशीराम इंगळे, सुनील बाबुराव वाघाळकर, रूपेश धोंडीराम चव्हाण, शिरीष किशनराव भावठाणकर, सय्यद अमजद सय्यद मकबुल, सौ.कल्याणी राहुल देशपांडे, सौ.जयश्री बालासाहेब घाडगे, ऍड.दयानंद अंकुशराव लोंढाळ, जावेद छोटू गवळी, व्यवस्थापक गजानन कुलकर्णी यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी संतोष मठपती, रोहित वाघमारे, सिमा मुळे, नारायण हाके, अनिकेत पाणकोळी, रविंद्र लंगे, विनोद कांबळे, तसेच पतसंस्थेचे पिग्मी प्रतिनिधी राम भस्मे, विजयकुमार गजरे, प्रकाश कदम, सतिश मठपती, विशाल देशमुख आणि सलिम मामू यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!