ताज्या घडामोडी

अंबाजोगाई नगरपरिषदेत नेमकं काय सुरू आहे? फळ व भाजी विक्रेत्यांकडून वसुलीबाबत प्रश्नचिन्ह भरारी न्युज..अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरात हातगाडीधारक, फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांकडून प्रत्येकी २० रुपये वसूल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या वसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या पावतीवर कोणतीही रक्कम नमूद केलेली नाही. पावतीवर सही आहे, परंतु ती कोणाची आहे हे स्पष्ट होत नाही. सदर पावतीवर “नगरपरिषद अंबाजोगाई, जिल्हा बीड” असा शिक्का मारलेला आहे. मात्र बाजारात फिरून ही रक्कम गोळा करणाऱ्या तरुणांकडे कोणतेही ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत : ही वसुली अधिकृत आहे का? संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आले आहे? यासाठी अधिकृत निविदा (टेंडर) काढण्यात आली होती का? वसुली करणाऱ्या व्यक्ती नगरपरिषदेचे अधिकृत प्रतिनिधी आहेत का? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित वसुली अधिकृत आहे की नाही याबाबत नगरपरिषद प्रशासनाने स्पष्टता द्यावी आणि गरज असल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 👉 प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भरारी न्युज..अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरात हातगाडीधारक, फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांकडून प्रत्येकी २० रुपये वसूल केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या वसुलीसाठी दिल्या जाणाऱ्या पावतीवर कोणतीही रक्कम नमूद केलेली नाही. पावतीवर सही आहे, परंतु ती कोणाची आहे हे स्पष्ट होत नाही. सदर पावतीवर "नगरपरिषद अंबाजोगाई, जिल्हा बीड" असा शिक्का मारलेला आहे. मात्र बाजारात फिरून ही रक्कम गोळा करणाऱ्या तरुणांकडे कोणतेही ओळखपत्र (आयडेंटी कार्ड) नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत : ही वसुली अधिकृत आहे का? संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात आले आहे? यासाठी अधिकृत निविदा (टेंडर) काढण्यात आली होती का? वसुली करणाऱ्या व्यक्ती नगरपरिषदेचे अधिकृत प्रतिनिधी आहेत का? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून, संबंधित वसुली अधिकृत आहे की नाही याबाबत नगरपरिषद प्रशासनाने स्पष्टता द्यावी आणि गरज असल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. 👉 प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!