ताज्या घडामोडी

मिरजगावातील सद्गुरु कृषी महाविद्यालयात १४ मार्च रोजी माजी विद्यार्थी मेळावा

मिरजगाव | भरारी न्यूज कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव येथे गुरुवार, दिनांक १४ मार्च रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सन २००९ पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या महाविद्यालयाने कृषी क्षेत्रात अनेक उच्च अधिकारी, पदाधिकारी तसेच यशस्वी व्यावसायिक घडविले आहेत. या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांचे अनुभव एकमेकांशी शेअर करता यावेत, नव्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे तसेच जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी विद्यार्थी मेळावा हा केवळ भेटीगाठींचा कार्यक्रम नसून संवाद, अनुभवांचे आदान-प्रदान आणि स्नेहबंध अधिक दृढ करणारा उत्साही सोहळा ठरणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासनाकडून सर्व माजी विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!