ताज्या घडामोडी

बर्दापूरमध्ये ऑनलाईन मटका-जुगाराचा सुळसुळाट? व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून धंदा सुरू असल्याची चर्चा

बातमी: भरारी न्युज अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे सध्या मटका जुगाराचा प्रकार वाढत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीऐवजी आता ऑनलाईन माध्यमाचा वापर करून हा व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही बुक्की एजंट प्रत्यक्ष ठिकाणी नसले तरी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आकडे स्वीकारले जात असल्याचे सांगितले जाते. संबंधित व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर आकडे पाठवले जातात, त्यावर रेट निश्चित करून समोरून रिचार्ज अथवा व्यवहाराची पुष्टी पाठवली जाते, अशी कार्यपद्धती असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीशिवाय जलद गतीने हा खेळ सुरू असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय गावातील काही पानटपऱ्यांवर गुटखा विक्री तसेच अवैध दारूविक्रीही सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. बर्दापूरसारख्या गावात अशा प्रकारच्या दोन नंबरच्या व्यवसायांना आळा बसणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे. संबंधित पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती तपासावी व जर अवैध प्रकार सुरू असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. बर्दापूर परिसरात सध्या या विषयावर जोरदार चर्चा सुरू असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!