महाराष्ट्र
आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड १८ भाग ३ चे वाचन पुर्ण झाले .
अंबाजोगाई : १ : मागील २८५ दिवसांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन संघर्षभूमी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांचे वाचन सुरु आहे. दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळात हे ग्रंथवाचन होत आहे. आज २८५ व्या वाचन दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड १८ भाग - ३ चे वाचन पुर्ण झाले आहे. आजच्या ग्रंथ वाचनापूर्वी प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करण्यात आले तसेच सामुहीक वंदना घेण्यात आली. नंतर सुभाष घाडगे यांनी भाषण क्रमांक २५२ ते २५४ या तीन भाषणांचे वाचन केले. सरणतंय गाथेने वाचनाचा समारोप झाला. याप्रसंगी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. नंतर भाषणातील विचारांवर चर्चा झाली. याप्रसंगी ॲड शाम तांगडे , विश्वनाथ सावंत , मुरलीधर कांबळे , बलभीम बनसोडे , राणोजी वैद्य , नरसिंग तरकसे , देवराव गायकवाड , बाबुभाऊ कांबळे आदींची उपस्थिती होती.
