आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उन्हाळ्याच्या तप्तीत अंबाजोगाईकरांसाठी ताजेपणाचा घोट – राडिगावच्या युवकाची अनोखी रसवंती रिक्षा!

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराच्या रस्त्यांवर सध्या एक खास आकर्षण ठरत आहे – एक चालतीबोलती रसवंती! राडिगाव येथील युवा उद्योजकाने आपल्या रिक्षावर रसवंती फिट करून नागरिकांना उन्हाळ्यात ताजा, स्वच्छ आणि स्वादिष्ट उसाचा रस उपलब्ध करून दिला आहे. केवळ १० रुपयांत मिळणारा हा थंड आणि शुद्ध रस गल्लीबोळांतून फिरणाऱ्या रिक्षावर सहज उपलब्ध आहे. पारंपरिक रसवंतींपेक्षा वेगळा अनुभव देणाऱ्या या उपक्रमामुळे अंबाजोगाईकर रसप्रेमींचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ताजेपणा, स्वच्छता आणि परवडणारी किंमत या त्रिसूत्रीवर आधारित ही सेवा उन्हाळ्यातील एक हक्काचं थंडगार स्थान बनली आहे. ही रसवंती संपर्कासाठी : 7020366565

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!