आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्र
संघर्षभूमीवरील निष्ठावंत पत्रकारितेला सलाम : ‘मुंबई आजतक’चे पत्रकार रोहीदास हातागळे यांचा भीमजयंती महोत्सव समितीतर्फे गौरव
अंबाजोगाई : २१ : संघर्षभूमीवर संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम आणि कार्यक्रम होत असतात. शिवाय १४ दिवशीय भीमजयंती महोत्सव देखील मोठ्या थाटात व उत्साहाने साजरा होतो. या सर्व कार्यक्रमांच्या व उपक्रमांच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसिद्ध होत असतात. यात पत्रकार रोहीदास हातागळे यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव संयोजन समिती - २०२५ च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. ॲड शाम तांगडे यांच्या हस्ते त्यांचा शाल , पुष्पगुच्छ , सन्मानपत्र , सन्मानचिन्ह व भारताचे संविधान हा ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन संघर्षभूमी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या आभार प्रमाणपत्रात असे म्हटले आहे की आपण गेली वर्षभर संघर्षभूमीवर होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे वृत्तांकण करून विविध माध्यमातून त्यास नियमित प्रसिद्धी देत आहात. कोणत्याही प्रकारचा व्यवसायिक लाभ नसतांना किंवा कधीही जाहीरातीची अपेक्षा न करता आपण हे कार्य करत आहात. सामाजिक बांधिलकी जपणारी अशी निरपेक्ष पत्रकारिता व आपल्या सारखा निरपेक्ष पत्रकार यांनाच ही बाब शक्य आहे. सर्वसामावेशी व समाजाभिमुख पत्रकारिता करणारे पत्रकार म्हणून आपले हे कार्य आमचा उत्साह वाढवणारे आहे. करिता आपल्या बद्दल असलेल्या निर्मळ स्नेहाचे प्रतिक म्हणून आम्ही हे आभार प्रमाणपत्र आपणास देत आहोत ! या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड संदीप थोरात यांनी केले. आभारपत्राचे वाचन संजय हतागळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ किर्तीराज लोणारे यांनी केले. याप्रसंगी डॉ गणेश सुर्यवंशी , सुभाष घाडगे , देवराव गायकवाड , नरसिंग तरकसे , राणोजी वैद्य , पांडूरंग ढगे , बाबुभाऊ कांबळे , पांडूरंग लांडगे , भरारी न्युज संपादक उत्तरेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती.
