आपला जिल्हादेश विदेशराजकीय

डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नागेश रणखांबे तर सचिवपदी संघमित्रा चौधरी यांची निवड……!

Spread the love

सोलापूर:- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त उत्सव समितीची बैठक नुकतीच डॉक्टर आंबेडकर मेमोरियल प्रशाला येथे संपन्न झाली. या वार्षिक बैठकीमध्ये डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी नागेश रणखांबे सर सचिवपदी सामाजिक कार्यकर्त्या संघमित्रा चौधरी यांची निवड करण्यात आली. सदरच्या निवडी शिवम सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.सदर बैठकीस राजाभाऊ सरवदे, राजा इंगळे, सुभानजी बनसोडे, ऍड. संजीव सदाफुले,अरुण भालेराव,राजेश उबाळे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 21 एप्रिल रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!