*जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संस्थेतील सन २०१५ नंतर दिलेल्या पदोन्नत्या व शिक्षक नियुक्त्यांच्या चौकशीचे शिक्षण संचालकांचे आदेश*.

नांदेड- जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड जि.नांदेड संस्थेची २०१५ नंतर अधिकृत व वैद्य कार्यकारिणी नसताना मागील अध्यक्षांनी २०१५ नंतर दिलेल्या पदोन्नत्या व केलेल्या शिक्षक नियुक्त्या व त्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यतेची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण संचालक पुणे यांनी शिक्षण उपसंचालक लातूर यांना दिले. या चौकशीतून शिक्षण विभागाचा व संस्था अध्यक्षांचा गैर कारभार चव्हाट्यावर येणार असे दिसते.

जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड जि. नांदेड संस्थेच्या कार्यकारिणीचा कार्यभार कार्यकाळ २०१५ ला संपला व नंतर अद्याप पुढील फेरफार बदल अर्ज मंजूर नसून वादात आहे. या बदल अर्जास धर्मदाय सह आयुक्त कडून मान्यता नसल्यामुळे अधिकृत व वैद्य कार्यकारिणी अस्तित्वात नाही. तरी २०१० ते २०१५ पर्यंत सदरील संस्थेचे अध्यक्ष राहिलेले शिवाजी नागोराव जाधव हे कार्यकाळ संपाला तरी संस्थेच्या नरसिंह विद्यालय उमरदरी , शिवाजी विद्यालय सिडको नांदेड व नरसिंह विद्यामंदिर नांदेड या शाळेत सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकांना पदोन्नती देऊन मुख्याध्यापक करणे, नियमबाह्य शिक्षकाच्या नियुक्त्या करणे, विनाअनुदानित वरुण अनुदानित वर बदली करत आहेत. व या नियमबाह्य व गैर कारभारास डोळेझाकून शिक्षणाधिकारी पण मान्यता देत आहेत. या गैर मान्यते मुळे शासनाच्या तिजोरीवर कोट्यावधीचा भुर्दंड पडत आहे. या गैर नियुक्त्या व पदोन्नती बाबत सदरील संस्थेचे अजीव सदस्य सखाराम कुलकर्णी यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांना निवेदन देऊन बनावट ठरावावर व अधिकृत नसलेल्या कार्यकारणीचे कोणतेच प्रस्ताव मंजूर करू नये असे निवेदन दिले होते .पण संस्था अध्यक्ष व शिक्षणाधिकारी या नियमबाह्य नियुक्त्या करतच होते. या गैर नियमबाह्य पदोन्नत्या त शिक्षक भरतीवर शिक्षणाधिकारी कारवाई करत नव्हते म्हणून सखाराम कुलकर्णी यांनी सचिव शालेय शिक्षण विभाग मुंबई, शिक्षण आयुक्त पुणे,व शिक्षक संचालक पुणे यांचे कडे या नियमबाह्य नियुक्त्यांची व पदोन्नती ची चौकशी करून या पदोन्नत्या व केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली .
या तक्रारीवरून शिक्षण संचालक पुणे यांनी शिक्षण उपसंचालक लातूर यांना या प्रकरणाची व अनाधिकृत असलेल्या कार्यकारीणीने या नियमबाह्य केलेल्या नियुक्त्या व पदोन्नती याची चौकशी करण्याचे आदेश दि.२७-०३-२०२४ ला दिले. या आदेशामुळे शिक्षण विभागाचा व संस्थेतील नियमबाह्य व गैरकारभार चव्हाट्यावर येईल असे दिसते .



