त्रिवेणी पांढरे यांची सेंट्रल बैंक ऑफ इंडियात (वर्ग १) कृषी अधिकारीपदी निवड……!.

सोलापूर : मित्र नगर(ता. उ. सोलापूर) येथील त्रिवेणी सिद्धार्थ पांढरे यांची आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतू सेंट्रल बैंक ऑफ इंडियात वर्ग १ च्या कृषी क्षेत्र अधिकारीपदी निवड झाली. बी. एस्सी. ॲग्रीचे शिक्षण रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज येथे पूर्ण केले नंतर त्रिवेणी यांनी एम.एसी.ॲग्रीचे शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे, शिवाजीनगर येथे करत असताना आयबीपीएसची परीक्षा दिली. यातून त्यांची कृषी अधिकारीपदी निवड झाली. त्रिवेणी पांढरे यांचे वडील माजी सैनिक सिद्धार्थ पांढरे, त्यांचे छायाछत्र बालपणीच हरवले असून , त्यांचा पश्चात आई अंजना सिद्धार्थ पांढरे यांनी वडिलांबरोबर राहून त्यांनी मुलींना चांगले शिक्षण दिले व आता त्यांचा कष्टाचं फळ या रूपात त्यांना मिळालं. त्रिवेणीच्या यशाबद्दल तिचे आजोबा कोंडीबा कोळेकर, आजी कस्तुरबाई कोळेकर, मामा चंद्रकांत कोळेकर, किरण पांढरे, पूनम पांढरे, रंजना माने, संतोष ढोणे, रेखा कोळेकर, ज्योती कोळेकर यांनी अभिनंदन केले. या यशाबद्दल त्रिवेणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



