न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अंबाजोगाई भरारी न्युज...| श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोदी लर्निंग सेंटर अंतर्गत न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, अंबाजोगाई येथे पडत्या पावसातही देशभक्तीच्या वातावरणात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंबाजोगाईचे विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नवनाथ घुगे यांनी ध्वजारोहण केले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव श्री राजकिशोर जी मोदी, कार्यकारी संचालक श्री संकेत भैया मोदी, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मनोज जी लखेरा, प्राचार्या तपस्या गुप्ता, प्राचार्य संतोष तर्क, प्राचार्य नरेश जयस्वाल, डॉ. अर्चना थोरात, सौ. सविता बुरांडे, डॉ. उद्धव शिंदे, श्री रुपेश चव्हाण, श्री गणेश मसने, मार्गदर्शक श्री चंद्रकांत गायकवाड, तसेच प्राचार्य श्री एम. प्रशांतकुमार यांची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी रंगतदार परेड सादर केली. उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे मनमोहक सादरीकरण करण्यात आले. यात चि. पार्थ गीते यांचे आक्रमक भाषण, चि. प्रणित नितीन घोबाळे यांनी सादर केलेले "संदेसे आते हैं" हे गीत, तसेच वायू हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले धर्मनिरपेक्षतेचे नाट्य विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चि. प्रणव फड व कु. श्रावणी चव्हाण यांनी केले. व्यासपीठावरून बोलताना डॉ. नवनाथ घुगे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थापक सचिव श्री राजकिशोर जी मोदी व कार्यकारी संचालक श्री संकेत भैया मोदी यांनी सर्व पालक, समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.