आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कर्जमाफीची तारीख तात्काळ जाहीर करा; बँकांनी शेतकऱ्यांची सेव्हिंग खाती चालू करावीत – तुकाराम चाटे

अंबाजोगाई प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन "सातबारा कोरा" करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत येऊन दोन वर्षे उलटूनही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते तुकाराम व्यंकटी चाटे यांनी केली आहे. सरकारकडून कर्जमाफी जाहीर न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, अनेक बँकांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांची सेव्हिंग खाती ‘कोड’ टाकून बंद केली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. "भीक नको पण कुत्रा आवर" अशी वेळ सरकारने शेतकऱ्यांवर आणली असल्याचा आरोप चाटे यांनी केला. सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर निर्णय घ्यावा चाटे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सरसकट कर्जमाफीची तारीख तात्काळ जाहीर करून बँकांना शेतकऱ्यांच्या खात्यावरील ‘कोड’ हटविण्याचे आदेश द्यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. अन्यथा, "जर कर्जमाफी देता येत नसेल तर शेतकऱ्यांची माफी मागून पुढील आर्थिक पर्यायांसाठी मार्गदर्शन करावे," असेही ते म्हणाले. मोर्चा आणि जलआंदोलनाची चेतावणी कर्जमाफीची तारीख जाहीर न झाल्यास शेतकरी मोठ्या संख्येने तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतील, कार्यालयास टाळे ठोकतील आणि जलभर आंदोलन करतील, असा इशारा चाटे यांनी दिला. "सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास पुढील होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सरकारवरच राहील," असे ते म्हणाले. तुकाराम व्यंकटी चाटे यांनी अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविषयी सविस्तर मांडणी केली. "शासनाने तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोकळे करावे," अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!