आपला जिल्हामहाराष्ट्र

राष्ट्रीय संत श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मतिमंद व मूकबधिर विद्यार्थ्यांना मोफत हेअर कटिंग सेवा

अंबाजोगाई – राष्ट्रीय संत श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा 2025 निमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा अंबाजोगाईतर्फे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, संत मंदिरांवर भगवे ध्वजारोहण, गायींना चारापट्टी वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन यांचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जोधाप्रसादजी मोदी मतिमंद विद्यालय आणि बोधवर्धिनी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे मोफत हेअर कटिंग करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमात अमोल शिंदे, हरीश वाघमारे, दीपक सुरवसे, संजयभाऊ कचरे, श्रीनिवास कचरे, नागेश सावंत, राजकुमार वखरे, मेजर गोपाळ ठोंबरे, वैजनाथ धाकतोडे, रोहित कस्तुरे, शिंदे सर, बालाजी वाघमारे आदी पदाधिकारी व सलून व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. एखाद्या संताच्या पुण्यतिथीनिमित्त असा अभिनव उपक्रम राबवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे शहरवासीयांनी सांगितले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!