आपला जिल्हादेश विदेशमहाराष्ट्र
तरुण नेतृत्वाची नवी उमेद – आदित्य पाटील यांची काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी निवड आदित्य पाटील एक ओळखीपलीकडचं नेतृत्व
केज दि ३१(प्रतिनिधी) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश समितीच्या सरचिटणीसपदी आदित्य अशोकराव पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही निवड केवळ एक पद नाही, तर पक्षाने नव्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे. आदित्य पाटील हे आपल्या अभ्यासपूर्ण, कार्यतत्पर आणि जनतेशी थेट संवाद साधणाऱ्या नेतृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी युवक काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा नेता म्हणून त्यांची छाप आहे. त्यांनी केवळ भाषणांमध्ये नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. ---चौकट-- नव्या जबाबदारीसह नवा विश्वास सरचिटणीसपदाच्या माध्यमातून त्यांच्यावर आता पक्ष संघटन मजबूत करण्याची, तालुका व जिल्हास्तरावर युवा नेतृत्व घडवण्याची आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे विचार प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आली आहे. ----------------- पक्षाच्या धोरणांचा प्रचार, जनतेशी संवाद, जनतेत काँग्रेसचा प्रभाव वाढवणे या गोष्टींवर त्यांचा विशेष भर असतो. त्यामुळेच हा निर्णय पक्षाच्या युवा धोरणांना अधिक गती देणारा ठरणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील जनसंपर्क शांत संयमी, पण ठाम भूमिका असणारे आदित्य दादा पाटील त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतील कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून, ही निवड पक्षासाठी आशेचा किरण ठरणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. पक्षाच्या राज्यातील नवसंघटन प्रक्रियेला आदित्य पाटील यांच्या रुपाने तरुण नेतृत्वाची नवी दिशा लाभेल, आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या मनामनात पुन्हा जागा निर्माण करेल, असा विश्वास वाटतो. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे
