आपला जिल्हाराजकीय
अंबाजोगाई भाजप शहराध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातील युवकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर येथील युवकांनी तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे व शहराध्यक्ष असेफोद्दीन बाबा खतीब यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,माजी मंत्री अशोकराव पाटील खासदार रजनीताई पाटील व जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांचे हात बळकट करण्यासाठी तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे व शहराध्यक्ष असेफोद्दीन बाबा खतीब यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई शहरातील हनुमान नगर भागातील प्रदीप (लाड) लाडके, नंदकुमार शितोळे , शितल शर्मा, यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून अंबाजोगाई चे भाजप शहराध्यक्ष यांच्या बालेकिल्लातील हे युवक आहेत काँग्रेस हा पक्ष सर्वसामान्य वंचित गोरगरिबांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आगामी काळात काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे व शहराध्यक्ष असे फोद्दीन बाबा खतीब यांच्या नेतृत्वात निष्टने काम करू असे प्रवेश केल्यानंतर हे युवक म्हटले तर आगामी काळात भाजप शहराध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातील शेकडो सर्वसामान्य नागरिक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एकीकडे भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर होताच भाजप शहराध्यक्षांच्या बालेकिल्ल्यातील नागरिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा अंबाजोगाई शहरात चर्चेचा विषय बनला आहे
