आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनदेश विदेश

हिटलरशाही’ की व्यवस्थापन? – अंबाजोगाईच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थी-प्राध्यापकांवर अन्याय!

अंबाजोगाई | प्रतिनिधी मराठवाड्यात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाईतील शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉ. उर्मिला परळीकर यांच्या कार्यकाळातील अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणावर वेळीच कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थी व प्राध्यापकांवर अन्याय? प्राचार्य परळीकर यांच्यावर हुकूमशाही वर्तनाचे आरोप असून, त्यांच्यावर विशेष न्यायालय ग्रेटर मुंबई येथे अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला सुरू आहे. असे असताना त्यांना प्रभारी प्राचार्यपद देण्यात आले, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. नियमबाह्य नियुक्त्या आणि जातीय भेदभाव? महाविद्यालयात नियुक्त्या करताना जाणीवपूर्वक काही उमेदवारांना डावलून जातीय वर्तन केल्याचा आरोप आहे. तासिका तत्त्वावर अपात्र उमेदवारांची भरती करण्यात आली. यामध्ये इंग्रजी, भूगोल, संगीत, ग्रंथपाल अशा विविध पदांवर अपात्र लोकांना नियम डावलून संधी देण्यात आली. अधिकाऱ्यांचा आदेश डावलून आर्थिक गैरव्यवहार? नोबल प्रोडक्शन सर्व्हिसेस या सुरक्षा कंपनीचा करार नोव्हेंबरमध्ये संपला असताना त्यांना अधिकृत मान्यता न देता तीन महिने कामावर ठेवले व रु. 95,580 परस्पर त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. हा आर्थिक गैरव्यवहार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अशा प्रकारे निधी हस्तांतर करता येतो का, असा सवाल उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि व्यवस्थापनाची उदासीनता! महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मूळ प्रमाणपत्र गायब होणे, पार्किंग सुविधा हटवणे, ऐतिहासिक झाडांची तोडफोड यांसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय, चौकशीसाठी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने संभाजीनगर येथे नेण्यात आल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. संपूर्ण चौकशी व तातडीने कारवाईची मागणी! या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून प्रभारी प्राचार्य पदावरून तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व इतर सामाजिक संघटनांनी केली आहे. 16 एप्रिल 2025 रोजी उपविभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!