आपला जिल्हामहाराष्ट्र

भावी नगरसेवक भीमसेन आप्पा लोमटे (नवाब) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – तरुणाईसाठी ठरत आहेत प्रेरणास्थान

अंबाजोगाई : नव्या दमाने राजकारणात प्रवेश करून कमी कालावधीतच युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि तरुणाईसाठी आशास्थान ठरलेले भीमसेन आप्पा लोमटे (नवाब) यांचा वाढदिवस साईबाबांची प्रतिमा देऊन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ‘भरारी न्यूज’चे संपादक उत्तरेश्वर शिंदे यांनी विशेष उपस्थिती दर्शवत त्यांना शुभेच्छा दिल्या. भीमसेन आप्पा लोमटे यांचा साधा स्वभाव, लोकांसाठी झटण्याची तयारी आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव यामुळे ते अल्पावधीतच युवकांचे लाडके नेते बनले आहेत. वार्ड क्रमांक 4 मध्ये ते हक्काचे नगरसेवक ठरतील, अशी भावना येथील जनतेत आहे. यावेळी अनेक युवा कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत तेच वार्ड क्रमांक 4 चे खरे नगरसेवक असतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. युवकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणारे लोमटे यांची खासीयत म्हणजे सर्वसामान्य जनतेशी कायम संपर्क ठेवणे आणि गरजूंसाठी तत्परतेने मदत करणे. त्यांच्या कार्यामुळेच स्थानिक पातळीवर त्यांच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 4 मध्ये भीमसेन आप्पा लोमटेच विजय मिळवतील, अशी चर्चा युवकांमध्ये रंगली आहे. युवकांसोबतच वयोवृद्ध नागरिक, महिला आणि विविध घटकांमध्येही त्यांची लोकप्रियता वाढत आहे. त्यांची सामाजिक जाण, कार्यतत्परता आणि सर्वांसाठी न्याय्य भूमिका यामुळे ते 'जनतेचे नगरसेवक' म्हणून ओळखले जात आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला असून, पुढील वाटचालीसाठी अनेकांनी यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या. 'भरारी न्यूज'कडूनही त्यांना उज्ज्वल भविष्याची आणि निरोगी आयुष्याची शुभेच्छा देण्यात आल्या.

Spread the love

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!