आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

केज तालुक्यातील गांजपूर येथे दत्ता जयंती उत्सव उत्साहात साजरा, प्राध्यापक ईश्वर मुंडे यांची प्रमुख उपस्थिती

धारूर प्रतिनिधी. केज तालुक्यातील गांजपूर येथे दत्ता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावातील भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भक्तिपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक ईश्वर मुंडे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनातून प्राध्यापक मुंडे यांनी दत्त भक्तीचे महत्त्व, नैतिक मूल्ये आणि समाजसेवेमधील भूमिका यावर प्रेरणादायी विचार व्यक्त केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील युवावर्ग आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. उत्सवात विविध धार्मिक विधी, भजन, कीर्तन आणि सामूहिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून साजरा झालेला हा उत्सव धार्मिक एकोपा आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरला.

Spread the love

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!