आपला जिल्हा

सुमेध शिंदे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

केज दि.१ - शहरातील फुलेनगर येथे वास्तव्यास असणारे तथा नगरसेविका पदमीनबाई शिंदे यांचे चिरंजीव सुमेध शिंदे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक 1 ऑक्टोबर रोजी घडली केज नगरपंचायतच्या नगरसेविका पदमीनबाई शिंदे यांचे चिरंजीव सुमेध शिंदे हे बप्पा नावाने सर्व परिचित होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते सक्रिय होते. दरम्यान, मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांना राहत्या घरीच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यानंतर त्यांना आंबेजोगाई येथे उपचारार्थ हलवण्यात आले होते. मात्र या हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!