आपला जिल्हामहाराष्ट्र

कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सर वर अंबाजोगाई वाहतूक शाखेचा हातोडा अंबाजोगाई बीड पोलिसांची कारवाई; 1 लाख 30 हजाराचा दंड वसूल

अंबाजोगाई प्रतिनिधी:- सय्यद नईम अंबाजोगाई वाहनधारकांच्या कर्णकर्कश सायलंसरच्या आवाजाने अंबाजोगाई शहरातील नागरीक त्रास झाले होते याबाबत प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक बारगळ यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पीआय विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाने वाहतूक पोलिसांच्या पथकाने आज गुरुवार दि 26 रोजी सनी5मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत 180 वाहनधारकांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार 200रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मागील कित्येक महिन्यापासून अंबाजोगाई शहरात कर्णकर्कश हॉर्न, फॅन्सी नंबर प्लेट आणि नवीन युवकांची बुलेट चे सायलंसर याने नागरिक पूर्ण त्रस्त झाले होते. काही हृदय रोगी वयोवृद्ध नागरिकांना रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले आहेत. सामान्य नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे माध्यमांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आवाज उठविला होता. याची दखल घेत पोलीस अधीक्षक बारगळ यांनी थेट बीड येथील वाहतूक शाखेच्या पथकाला सूचना केल्या नंतर अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेने 26 बुलेट चे सायलंसर, फॅन्सी नंबर प्लेट व कर्णकर्कश आवाज असणारे हॉर्न असे मिळून 180 वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 लाख 30 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाई मुळे वाहनधारकांना चांगलाच चाप बसणार आहे. बीड वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप , पीएसआय हनुमान घोडके , पी.एस. आय. पवार वाहतूक पोलीस बजरंग ठोंबरे, नारायण दराडे, नितीन काकडे, आर टी पवार, आदिनाथ मुंडे, वसीम शेख, अरुण राऊत, त्रिंबक फड , Lpc गायकवाड, बाळासाहेब पारवे ,मधुकर रोडे , राधा काळे दीपाली बोंदले या वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबविली 180 वाहनांवर कारवाई केली म्हणजे मोहीम संपली असे नव्हे अंबाजोगाई शहरात बीड वाहतूक पोलीस शाखेचे पथक आठ दिवसातून एकदा येऊन अश्या कारवाया करणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे.कारवाईची मोहीम संपली असे नागरिकांनी समजू नये आगामी काळात आशा अनेक मोहिमेला कायदा तोडणाऱ्याना सामोरे जावेलागेल हे नक्की

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!