आपला जिल्हाकृषीदेश विदेशमहाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजाराची तात्काळ मदत करावी ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे यांची निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्याकडे मागणी!

परळी वैजनाथ प्रतिनिधी मराठवाड्यातील शेतकरी सुलतानी आणि आसमानी संकटाचा सामना करत आहे. गेल्या आठ दिवसापासून मराठवाड्यात अतिशय जोराचा पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील आलेली पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयाची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे , राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस , अजित दादा पवार कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे आणि बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मराठवाड्यात समाधानकारक पाऊस काळ झाला मात्र गेल्या आठ दिवसापासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी ,कापूस आधी पिके नष्ट झाली आहेत तोंडाला आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. सोयाबीनचे पीक पावसामुळे काढता येत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्याला आर्थिक मदत देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्याचा सन 2018 -19 चा पिक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावा तसेच यावर्षीचा शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा ही तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावा अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!