आपला जिल्हामहाराष्ट्र

जोगाईवाडी ग्रामपंचायत कार्यालयात स्वयंभू नेत्याचा भला मोठा फोटो कसा?

अंबाजोगाई प्रतिनिधी :- केज मतदार संघाला जहागिरी समजणाऱ्या व स्वतःला महापुरुषाच्या बरोबर महान समाजसेवक समजणाऱ्या स्वयंभू नेत्यांचा भाजपच्या ताब्यात असलेल्या जोगाईवाडी ग्रामपंचायत मध्ये महापुरुषाबरोबर नंदकिशोर मुंदडा यांचा फोटो कसा? असा सवाल जनता करत आहे या करिता उपविभागीय कार्यालय, अंबाजोगाईत महापुरूष यांच्या प्रतीमेसोबत व खाली राजकीय नेते यांची प्रतीमा लावल्याने आमच्या भावना दुखावल्याने सदरील ग्रामपंचायत कार्यालयावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी भीम युवा सेनेच्या वतीने करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय नियमानुसार जे राष्ट्रीय महापुरूष व स्वातंत्र्य सैनानी यांचे प्रतिमा लावण्याचा नियम आहे. परंतु सदर महापुरूषांच्या तैलचित्रासोबत समाविष्ट नसलेले व नियमबाह्य स्वर्गीय मंत्री विमलताई मुंदडा यांची प्रतिमा महात्मा गांधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या मधोमध प्रतिमा बसवण्यात आली आहे. तसेच सदर प्रतिमेच्या खाली सर्व प्रतिमेपेक्षा मोठा फोटो नंदकिशोर मुंदडा यांचा बसवण्यात आला आहे. सदर बाब व्हिडीओ शुटींग व फोटो मध्ये कैद केली असून, अशा प्रकारे महापुरूषांच्या बरोबरीने राजकीय लोकांचे नियमबाह्य प्रतिमा लावल्याने आम्ही सर्व महापुरूष अनुयायी म्हणुन आमच्या प्रचंड भावना दुखावल्या आहेत. तरी सदर प्रकरणी दोषी ग्रामपंचायतचे सर्व जबाबदार पदाधिकारी कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन आपल्याकडे सादर करण्यात येत आहे. कारवाई न झाल्यास सदर घटनेच्या निषेधार्थ कारवाईसाठी आंदोलन करण्यात येईल.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!