आपला जिल्हामहाराष्ट्र

अखेर लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र गळती प्रकरणी छत दुरूस्तीचे काम सुरू; ढवळेंच्या पाठपुराव्याला यश:- डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:- ( दि.१९ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाळ्यात गळती लागली असुन रूग्णांची गैरसोय होत असताना दि.१९ सोमवार रोजी ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी सुनिता अमोल बोरखडे रा.बोरखेड बाळंतीणीची दुपारी आलेल्या पावसामुळे छताला गळती लागल्याने हेळसांड झाली होती. संबंधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी डॉ . उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना लेखी तक्रार करून रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर डॉ.उल्हास गंडाळ यांनी रूग्णांची गैरसोय होऊ नये व आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून गळती रोखण्यासाठी दुरुस्तीसाठी ५ लक्ष रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. शासन दरबारी आवाज बुलंद केल्याबद्दल प्रसार माध्यमांचे आभार :- डॉ.गणेश ढवळे ---- लिंबागणेश येथील आरोग्य केंद्राला गळती लागल्याने रूग्णांची हेळसांड व गैरसोय याविषयी विविध दैनिकातुन मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्याची दखल घेऊन अखेर आज दि.१९ रोजी आज प्राथमिक आरोग्य केंद्रातील छताच्या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली असुन आता भविष्यात पावसाळ्यात छत गळुन रूग्णांची होणारी हेळसांड थांबणार आहे.याबद्दल डॉ . गणेश ढवळे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.संदिप क्षीरसागर, डॉ . उल्हास गंडाळ जिल्हा आरोग्य अधिकारी बीड आणि प्रसार माध्यमांनी शासन दरबारी आवाज बुलंद केल्याबद्दल प्रसार माध्यमांचे आभार मानले आहेत. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं.८१८०९२७५७२

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!