ताज्या घडामोडी

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार आज उद्धाटन

बीड, दि. 19 (जि. मा. का.) :- कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक/युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविदयालयांमध्ये “कौशल्य विकास केंद्र” स्थापन करून महाविदयालयीन युवक/युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने या विभागामार्फत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र(ACKVK)” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. योजनेचा शुभारंभ दि.20/09/2024 रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पध्दतीने बीड जिल्हयातील महाविदयालयात होत आहे. त्यामध्ये कै.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर,आर्टस,कॉमर्स क्षीरसागर कॉलेज बीड, कै.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर,ॲग्रीकल्चर,,नाथ महाविद्यालय,बीड, विश्वनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,वांगी, ओम नर्सिग स्कुल,बीड, समर्थ नर्सिग,बीड, शिव कॉलेज ऑफ मॅनेजमेंन्ट सायन्स,बीड, नविन उच्च माध्यमिक विदयालय,लिंबारूई ता.जि.बीड, देवगिरी महिला विद्यालय,बीड, तुलसी कॉम्प्युटर सायन्स ॲन्ड इन्फॉरेमेशन टेक्नालॉजी,बीड, कलासाई कॉलेज,बीड, तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,बीड, गोरखक्षनाथ विदयालय ॲन्ड ज्युनियर कॉलेज डेकणमोहा ता.जि.बीड, यशवंतराव चव्हाण कॉलेज,अंबाजोगाई ,कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स ॲन्ड इन्फॉरेमेशन टेक्नालॉजी, अंबाजोगाई, जय किसान महाविद्यालय,आपेगाव,अंबाजोगाई, वसुंधरा कॉलेज ऑफ आर्टस,कॉमर्स घाटनांदुर,अंबाजोगाई, पद्मश्री आप्पसाहेब पवार, आर्टस, कॉमर्स ॲन्ड सायन्स सिनियर कॉलेज, अंबाजोगाई, बी.एस.पी संस्था खोलेश्वर महाविद्यालय,अंबाजोगाई, एम.एस.पी.महामंडळ राजमाता जिजाऊ महाविद्यालय,किल्लेधारूर, लोकशक्ती पी.एस.ॲन्ड ज्युनियर कॉलेज,देवदहिफल, किल्लेधारूर, नाथकृपा माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय,कसारी, किल्लेधारूर, ॲड बी.डी.हंबर्डे महाविद्यालय,आष्टी, एसी.एस कॉलेज ऑफ फॉरम्सी, आष्टी, आनंदराव धोंडे, आर्टस,कॉमर्स ॲन्ड सायन्स,आष्टी, आर.बी.अट्टल, आर्टस,कॉमर्स ॲन्ड सायन्स,गेवराई, त्वरितापुरी आर्टस ॲन्ड सायन्स कॉलेज, तलवाडा,गेवराई, ग्रामीण ॲडव्हान्स प्रा. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टियुट,माजलगाव, जनविकास महाविदयालय,बनसारोळा,केज, शाम जुनियर कॉलेज,केज, वैदयनाथ विधी महाविदयालय,परळी, लाटे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविदयालय,परळी, नवगण, आर्टस,कॉमर्स ॲन्ड सायन्स,परळी, पंडीत गुरू पर्डिकर महाविदयालय,सिरसाळा,परळी, कालीकादेवी महाविदयालय, आर्टस,कॉमर्स ॲन्ड सायन्स,शिरूर कासार, श्री. स्वामी अमृत भारती सेंकन्डरी स्कुल,पाटोदा या महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK)” चे आभासी पध्दतीने उद्धाटन पार पडणार आहे. तरी या प्रसिध्दीपत्राकाव्दारे सर्व विदयार्थी,जनता,लोकप्रतिनिधी यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विदयालयांमध्ये उद्धाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!