आपला जिल्हा

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात संपन्न

बीड (प्रतिनिधी)- श्री श्री रविशंकर विद्या मंदिर पिंपरगव्हाण रोड बीड येथे आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 वार मंगळवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री कुडके सर ,श्री शर्मा सर ,श्री पालवे सर यांची उपस्थिती होती. तसेच संस्थेचे सदस्य जैन सर, संस्थेचे सचिव श्री पारगावकर सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री हंसे सर, शाळेच्या उपमुख्याध्यापिका अनिता सूर्यवंशी मॅडम, आदर्श नगर शाखेच्या समन्वयक प्राजक्ता देशमुख मॅडम यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक गोविंदभाई श्रॉफ, सरदार वल्लभभाई पटेल व पूज्य गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनोगतात अतिथी कुडके सर म्हणाले की, निजामांच्या गुलामगिरीतून 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्त झाला . स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ, पानसरे या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतःच्या प्राणांची परवा न करता निजाम विरोधात लढा दिला व मराठवाडा मुक्त झाला. विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीतील स्वराली तांबारे या विद्यार्थिनीने आपल्या वक्तृत्वातून मराठवाडा मुक्ती संग्राम दिना विषयी माहिती सांगितली. यासोबतच अनंत चतुर्दशी , गणपती विसर्जन निमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते त्यात इयत्ता दुसरी, चौथी पाचवी व सहावीतील तसेच पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी नृत्य शिक्षक किरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असे नृत्य सादर केले. गणेशोत्सवानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा कुलकर्णी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथी वर्गातील अनन्या व स्वानंदी या विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्टपणे केले तर आभार प्रदर्शन इयत्ता सहावीतील अक्षरा मस्के या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते गणपतीची आरती करून मिरवणुकीसह अतिशय उत्साहात गणपती विसर्जन करण्यात आले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!