आपला जिल्हामहाराष्ट्र

“वालचंद चा ओंकार सचिन लंगाळे जिल्हास्तरीय नवोपक्रम विज्ञान प्रकल्प स्पर्धेत प्रथम “

Spread the love

 सोलापूर:- (26 डिसेंबर)- संगमेश्वर नवोपक्रम (इनोव्हेटिव्ह ) जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धेत , वालचंद कनिष्ठ महाविद्यालया तील इयत्ता 11 वी (विज्ञान) विभागातील विद्यार्थी चि. ओमकार सचिन लंगाळे याने, विज्ञान प्रकल्प प्रदर्शन या अंतर्गत, ‘ सुलभ यांत्रिक शौचालय’ या वृद्ध व अपंग व्यक्तीसाठी तयार केलेल्या स्वयं चलित प्रकल्प सादरीकरणामध्ये जिल्ह्यातील 110 प्रकल्पातून,’प्रथम’ क्रमांकाचे, रुपये 3000/- रोख, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन, युवा संशोधक राहुल बुऱ्हाणपुरे यांच्या शुभहस्ते, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, यांच्या मुख्य उपस्थितीत ‘हृदय’ सत्कार करण्यात आला . त्याला, श्री पंडित एस.व्ही, श्री. भिडे एन. जी. यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य श्री अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!