आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यानी व्यसनापासून दूर रहावे- अक्कलकोट क्षयरोग पर्यवेक्षक डॉ. एन वाय दलाल 

Spread the love

अक्कलकोट:- तंबाखू व गुटखा खाल्याने कॅन्सर सारखा जीवघेणा आजार जडतो तर दारूमुळे कित्येकांचे  संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तेव्हा विद्यार्थ्यानी व्यसनापासून दूर रहावे असे मत अक्कलकोट क्षयरोग पर्यवेक्षक डॉ.एन वाय दलाल यांनी व्यक्त केले.

महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरूबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या  मौजे मैदर्गी ता.अक्कलकोट येथील विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी तर प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी व प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्य व उच्च माध्य. च्या विभाग प्रमुख सौ पूनम कोकळगी, सेमी इंग्रजी विभाग प्रमुख रूपाली शहा हेही उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रम आधिकारी  प्रा.राजशेखर पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक समर्थ पवार यांनी केले. आभार राष्ट्रीय सेवा योजना ची    स्वयंसेवक किरण मोरे यांनी मानले कार्यक्रमास प्रा तुकाराम सुरवसे, प्रा. जयश्री वाले, प्रा.शिल्पा धुमशेट्टी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!