*महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमच्या मुख्य समन्वयक पदी रामकृष्ण कोंड्याल यांची नियुक्ती……!

सोलापूर:- अखिल भारत पद्मशाली संघम , मुख्यालय हैद्राबाद चे अध्यक्ष कंदगटला स्वामी यांनी विविध प्रांत/ संघम उपप्रांत संघमच्या सुधारणेसाठी आणि उत्तम समन्वयाच्या दृष्टीने अखिल भारत पद्मशाली संघम चे उपाध्यक्ष तथा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त आदरणीय रामकृष्ण कोंड्याल यांची महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघच्या मुख्यसमन्वयक पदी निवड केले. आदरणीय रामकृष्ण कोंड्याल यांचे मुख्य समन्रयक पदी निवड झालेने महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमच्या वतीने अध्यक्ष भुपती कमटम यांचे हस्ते शाल,बुके देऊन सत्कार करण्यांत आले. याप्रसंगी रामकृष्ण कोंड्याल यांनी सत्काराला मार्गदर्शन करताना अखिल भारत पद्मशाली संघमच्या समन्वयातून आणि सर्वांच्या सहकार्याने पद्मशाली समाज एकत्रित करून विकास करू या असे आवाहन केले. यावेळी भुपती कमटम यांनी कोंड्याल काका यांच्या मार्गदर्शना खाली समाज उन्नती कडे नेण्यास कटीबध्द असल्याचे सांगितले. या सत्कार कार्यक्रमांस प्रधानसचिव यशवंत इंदापुरे,खजिनदार श्रीनिवास येमूल,नगरसेवक विनायक कोंड्याल, रवि इंदापुरे, महाराष्ट्र राज्य पदमशाली युवक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय बडगू , प्रकाश कोटा आदी मान्यवर उपस्थित होते.



