आपला जिल्हामहाराष्ट्र

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील रा.से.यो.कडून एकता दौड….!

Spread the love

अक्कलकोट-:(राजेश पवार) भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून राष्ट्रीय दौड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय ते एस. टी.स्टँड पर्यंत विद्यार्थ्यांनी ही एकता दौड यशस्वीपणे पूर्ण केली.
प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी एकतेची शपथ दिली. यावेळी प्राचार्य मलकप्पा भरामशेट्टी हे उपस्थित होते.एकता दौड कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश पवार यांनी केले. यावेळी डॉ शीतल झिंगाडे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षण सहसंचालक कडून कौतुक…
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रा.से. यों.ने आयोजित केलेल्या एकता दौड बद्दल शिक्षण सहसंचालक डॉ.उमेश काकडे यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.यावेळी प्राचार्य डॉ.सुरेश पवार,प्राचार्य गुरुशांत चित्ते , प्राचार्य डॉ.राजेंद्रसिंह लोखंडे,प्रशासन अधिकारी विकास कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!