आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*संमोहन तज्ञ डॉक्टर रविन्द्र सोरटे आणि डॉ.अलका सोरटे यांचे 5 नोव्हेंबर रविवारी मोफत संमोहन शिबिराचे आयोजन ……..!*

Spread the love

*सोलापूर:- महाराष्टातील प्रख्यात संमोहन तज्ञ डॉक्टर रविन्द्र सोरटे आणि डॉ.अलका सोरटे यांनी रविवारी मोफत संमोहन शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरात सर्व प्रकारच्या मानसिक आणि मनो शारिरीक समस्यावर मोफत मार्गदर्शन करण्यात येणार असून गरजुनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराचे स्थळ हॉटेल ऐश्वर्या सोलापूर असून वेळ दुपारी दोन ते सायं चार अशी असेल. या शिबिरात प्रात्यक्षिक करून संमोहन कसे कार्य करते हे शास्त्रीय पद्धतीने सांगितले जाईल.
हिप्नॉटिझम अर्थात संमोहन शास्त्र होय,हे आपले भारतीय प्राचीन अध्यात्मशास्त्र आहे. हिप्नॉटिझम हे बाह्यमन आणि अंतर्मन यावर आधारित शास्त्र असून या शास्त्राच्या माध्यमातून अंतर्मनाची 90% शक्ती जागृत केली जाते, आणि या शक्तीचा वापर केला जातो. हिप्नॉटिझम शास्त्राद्वारे मानसिक समस्या आणि मनोशारीरिक समस्यांवर उपचार करता येतो. हिप्नॉटिझम शास्त्राला जागतिक आरोग्य संघटनेने शास्त्र म्हणून मान्यता दिलेली आहे तसेच भारतीय केंद्रसरकारने देखील उपचार पद्धती म्हणून मान्यता दिलेली आहे.मनोविकारतज्ञांच्या उपचारा सोबतच या उपचार पद्धतीचा पूरक उपचार पद्धती म्हणून वापर केल्यास लवकर गुण येतो. संमोहन तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे आणि डॉ.अलका सोरटे गेली बत्तीस वर्षे या क्षेत्रात काम करत असून हिप्नॉटिझम शास्त्राच्या उपचाराने उभयतांनी हजारो मानसिक रुग्णांना नवसंजीवनी दिलेली आहे.संमोहन उपचाराद्वारे मानसिक समस्या दूर करता येतात त्या पुढील प्रमाणे मानसिक समस्या, ताणतणाव,अनामिक भीती, आत्महत्येचे विचार, आत्मविश्वासाची कमतरता, (निद्रानाश) अर्थात झोप न लागणे मानसिक लैंगिक समस्या,भीती, चिंता,काळजी आणि नैराश्यावर उपचार करून अनेक मानसिक रुग्णांना मानसिक दृष्ट्या सक्षम करून त्यांचे जीवन सुखी केले आहे. आपणास वरील प्रकारे त्रास होत असल्यास खचून जाऊ नका किंवा घाबरून जाऊ नका एक वेळ माझ्या सोलापुरातील येथील संमोहन उपचार केंद्राला अवश्य भेट द्या किंवा मला माझ्या भ्रमणध्वनी 989090 2086 या क्रमांकावर संपर्क माझ्याशी सम्पर्क साधा असे आवाहन डॉ. रविंद्र सोरटे यांनी केले आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून त्यांनाच प्रवेश दिला जाईल.*.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!