ताज्या घडामोडी

कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात,!आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व सांगत युवा पिढीने दररोज योगा करणे आवश्यक आहे. प्रतिभा वरीष्ठ महाविद्यालय शारीरिक विभागाचे संचालक डॉ. आनंद लुंकड.

Spread the love

कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा
आवाज न्यूज चिंचवड २१ : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाकडून आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व योगा प्रार्थनेने करण्यात आली. या कार्यक्रमास प्रतिभा वरीष्ठ महाविद्यालय शारीरिक विभागाचे संचालक डॉ. आनंद लुंकड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर विशेष उपस्थिती म्हणून प्रा.पी.टी. इंगळे हे होते. प्रमुख पाहुणे डॉ. आनंद लुंकड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगाचे महत्त्व सांगत युवा पिढीने दररोज योगा करणे आवश्यक आहे असे सांगितले.
या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका शबाना आणि प्रा. अक्षय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहभागी विद्यार्थ्यांनी कृतिशील योगांचे प्रात्यक्षिके केली.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक विभागाच्या प्राध्यापिका शबाना शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका सुरेखा कुंभार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!