आपला जिल्हामहाराष्ट्र

बुधवार 29 मार्च रोजी कै.वि.मो. मेहता प्राथमिक शाळा, जुळे सोलापूर इ.४थी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न…..!

Spread the love

बुधवार 29 मार्च रोजी कै.वि.मो. मेहता प्राथमिक शाळा, जुळे सोलापूर इ.४थी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न…..!

सोलापूर:- (उपसंपादक रत्नाकर लोंढे)बुधवार दि.२९/३/२०२३ रोजी कै.वि.मो. मेहता प्राथमिक शाळा, जुळे सोलापूर येथे इ.४थी मधील विद्यार्थ्यांचा *निरोप समारंभ* आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास ह. दे. प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रकाश कांबळे व शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सौ. श्रुती कुलकर्णी यांनी ‘अशी पाखरे येती’ हे गीत सादर केले. मुख्याध्यापिका मंजुषा कुगावकर यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील विविध उपक्रमांची माहिती सांगितली. शाळेतर्फे मान्यवरांचा व इ.४थी च्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. इ.३री मधील अद्वैत आराध्ये याने आपल्या इ.४थी मधील ताई दादांना निरोप देत अतिशय भावनिक शब्दात मनोगत व्यक्त केले. इ.४थी मधील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून ” सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप देऊन नाते तुटत नाही.” अशा भावना व्यक्त केल्या.

प्रमुख अतिथी प्रकाश कांबळे सर यांनी “आपल्याला ज्या विषयाची आवड आहे, त्यात खूप यश मिळवा व पुढे जा” अशा शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. शीतल जालीमिंचे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!