ताज्या घडामोडी

लोणावळा येथील अग्निशमन केंद्राच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न

Spread the love

लोणावळा :लोणावळा नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्रमांक 53 येथील अग्निशमन केंद्राच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

 

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते फीत कापून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सुवर्णा अकोलकर, नगरसेवक श्रीधर पुजारी, दिलीप दामोदरे, राजू बच्चे, पूजा गायकवाड, ललित सिसोदिया, मंदा सोनवणे, निखिल कवीश्वर, बिंदा गणात्रा, रचना सिनकर, सुधिर शिर्के, आरोही तळेगावकर, संध्या खंडेलवाल, नगर अभियंता विकास मेमाने, वैशाली मठपती आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुरेखा जाधव म्हणाल्या, अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा अग्निशमन केंद्राचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. 2 कोटी रुपये खर्च करून ही सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. या केंद्रात तीन गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून इमारतीमध्ये केंद्राचे ऑफिस बांधण्यात आले आहे. एखादी दुर्घटना घडल्यास क्षणाचाही विलंब न लावता एका फोन कॉलवर अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल होईल अशी सुसज्ज यंत्रणा येथे उभी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!