ताज्या घडामोडी

नूतनीकरणानंतर हनुमान जीम पुन्हा सुरू

Spread the love

तळेगाव : येथील हनुमान जीम नुतनीकरणानंतर नवीन व्यायाम साहित्यासह पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.

गुरुवार (28 ऑक्टोबर )रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 6 मधील वाहिला पार्क येथील हनुमान जिमचे उद्घाटन नगरसेवक गणेश खांडगे नगरसेविका हेमलता खळदे माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे यांच्या हस्ते पार पडले.

नगरसेवक हेमलता खळदे यांच्या मार्गदर्शनाखाली जून महिन्यापासून गेली चार महिने व्यायाम शाळेच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम सुरू होते. दरम्यानच्या काळात इमारतीचे वॉटर प्रूफिंग करणे, रंगरंगोटी करणे, नवीन फरशी बसवणे इत्यादी कामे पूर्ण करून जिमसाठी नवीन साहित्य देण्यात आले.

या जिमसाठी एकूण 11 लाखाच्या निधीतून सदर कामे करण्यात आली. सर्व आवश्यक कामाच्या पूर्ततेनंतर जिमचे उद्घाटन करून व्यायामासाठी खुली करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!