ताज्या घडामोडी

निगडी ते लोणावळा बस सेवा आजपासून प्रवाशांच्या सेवेत

Spread the love

लोणावळा : निगडी ते लोणावळा बस सेवेचा शुभारंभ झाला असून बस सेवा आजपासून प्रवाशांच्या सेवेत आली आहे. लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते ही सेवा सुरू करण्यात आली.

कामशेत पर्यंत धावणारी पीएमपीएमएल बस लोणावळ्या पर्यंत सुरू करावी अशी मागणी प्रवासी अनेक वर्षापासून करत होते. लोणावळा ते चिंचवड -पिंपरी प्रवासासाठी केवळ लोकल सेवेवर अवलंबून असणारे चाकरमाने विद्यार्थी वर्ग यामुळे सुखावला आहे.

 

लोणावळा ते निगडी या मार्गावर 9 बसेस धावणार आहेत.तर तिकिटाचा दर माणसी 55 रुपये असणार आहे. रेल्वे दवाखाना व शांती चौक याठिकाणी बसथांबा असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!