ताज्या घडामोडी
अंबाजोगाई शहराच्या विकासाला नवी दिशा नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा…
अंबाजोगाई | प्रतिनिधी अंबाजोगाई शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सध्या सकारात्मक आणि ठोस हालचाली सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार केलेले नगराध्यक्ष काकाजी यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकासाची प्रक्रिया गती घेत आहे. अंबाजोगाईला आधुनिक, सुबक आणि सक्षम शहर म्हणून घडवण्याचे स्पष्ट व्हिजन त्यांनी मांडले असून त्याची अंमलबजावणीही टप्प्याटप्प्याने सुरू आहे. विकासाचे स्पष्ट व्हिजन नगराध्यक्षांनी केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, हरित उपक्रम, सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि डिजिटल प्रशासन अशा विविध क्षेत्रांत बदल घडवून आणण्याचा ठोस आराखडा तयार केला आहे. शहर विकास हा केवळ इमारती उभारण्यापुरता मर्यादित नसून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा त्यामागील व्यापक हेतू असल्याचे त्यांच्या कामातून स्पष्ट होते. पायाभूत सुविधांवर विशेष भर शहरातील मुख्य रस्त्यांचे मजबुतीकरण, अंतर्गत भागातील गटारी व ड्रेनेज व्यवस्थेची सुधारणा, पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना आणि स्वच्छता अभियान राबवून सुंदर अंबाजोगाई घडवण्यावर भर दिला जात आहे. आधुनिक एलईडी दिवे आणि सीसीटीव्ही यंत्रणेमुळे सुरक्षित व प्रकाशमान शहर उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन नगरपरिषद निर्णय प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग वाढवणे, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करणे आणि विकासकामांची दर्जेदार अंमलबजावणी करणे यावर नगराध्यक्षांचा विशेष भर आहे. प्रशासन आणि सभागृह यांच्यात सुसंवाद ठेवून कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वपक्षीय सहकार्याची गरज शहराचा विकास हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून तो सर्व अंबाजोगाईकरांचा आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकहिताच्या दृष्टीने सर्व नगरसेवकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. विकासाच्या दृष्टीकोनाला सकारात्मक प्रतिसाद देत सभागृहात सहकार्याची भूमिका घेणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. नागरिकांच्या अपेक्षा अंबाजोगाईतील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि प्रगत शहराची अपेक्षा आहे. युवकांसाठी रोजगारनिर्मिती, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, ज्येष्ठांसाठी सोयीसुविधा आणि सर्वसामान्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी सर्वांची इच्छा आहे. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आशादायी मानले जात आहेत.




