ताज्या घडामोडी
श्री खोलेश्वर मा.विद्यालयात पत्रकारांचा सन्मान करत दर्पण दिन साजरा.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात दि. ६ जानेवारी २०२६ रोजी दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष डॉ. अतुल देशपांडे होते. प्रमुख उपस्थितीत शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगांवकर, जेष्ठ पत्रकार विरेंद्र गुप्ता, दत्ता अंबेकर, शिवकुमार निर्मळे व मुख्याध्यापक अनंतराम कोपले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर उपस्थित पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रदीप तरकसे, दत्ता अंबेकर व शिवकुमार निर्मळे यांनी पत्रकारितेतील अनुभव कथन करत आजच्या सोशल मीडियाच्या युगात जबाबदार पत्रकारितेचे महत्त्व विशद केले. मुख्याध्यापक अनंतराम कोपले यांनी शालेय उपक्रम समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अतुल देशपांडे यांनी पत्रकारितेतील आव्हाने व अंबाजोगाईतील सशक्त पत्रकारिता परंपरेचा उल्लेख केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे, पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे, कार्यक्रम प्रमुख श्रीकांत देशपांडे व विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




