ताज्या घडामोडी
निश्चित ध्येय असेल तर यश नक्कीच मिळते –प्रा.ईश्वर मुंडे कक्ष अधिकारी रामदास चोले यांचा सत्कार संपन्न
किल्ले धारूर (प्रतिनिधि) मानसाच्या आयुष्याचे ध्येय शिश्चित असेल आणी प्रमाणिकपणे मेहनत केली तर यश नक्कीच मिळते असे प्रतिपादन ईश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव प्रा.ईश्वर मुंडे यांनी केले. तालुक्यातील आसोला गावचे सुपुत्र रामदास द्वारका नामदेव चोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत मंत्रालयीन कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार दि.७ जानेवारी २०२६ बुधवार रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमात प्रा.ईश्वर मुंडे बोलत होते. पुढे बोलताना प्रा.ईश्वर मुंडे म्हणाले की,श्री रामदास चोले यांनी मेहनत करून खूप मोठे यश संपादन केले आहे या पुढे आई वडील व महाराष्ट्रातील जनतेची प्रमाणिकपणे सेवा करून आसोला गाव व परिसराचे नावलौकिक करावे. या वेळी बोलताना गावचे सुपुत्र ॲड.बालासाहेब चोले म्हणाले,या पुढे आनखी परिक्षा देऊन रामदास चोले उच्च पद मिळवतील. डॉ.आबासाहेब तिडके म्हणाले की,मी प्रतिकूल परिस्थितीत उच्च वैद्यकीय शिक्षण घेऊन स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय,अंबाजोगाई येथे कार्यरत आहे.परिस्थितीची जाणीव ठेवून साधी राहणी,उच्च विचार करून प्रयत्न केल्यास जीवनात यश मिळतेच. पत्रकार सुनील कावळे या वेळी म्हणाले की,बीड जिल्हा हा ऊसतोड मजूरांचा जिल्हा ही ओळख पुसून बीड जिल्हा हा अधिका-यांचा जिल्हा ही ओळख निर्माण व्हावी. या प्रसंगी आदर्श शिक्षक सदाशिव थोरात,सुरज लोखंडे,इंजि.आर्यन वाव्हळ यांची समयोचित भाषणे झाली. सत्काराला उत्तर देताना कक्ष अधिकारी श्री रामदास चोले म्हणाले की,आई वडीलांनी ऊसतोडून मला शिकवले यांची मी जाणीव ठेवून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करेल तसेच आपले गाव व परीसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी अधिकारी होतील या साठी मार्गदर्शन करेल. कार्यक्रमाचे नियोजन,सूत्र संचालन व आभार प्रकटन श्रीधर चोले यांनी केले. कार्यक्रमास सरपंच महादेव चोले,माजी उप सभापती ज्ञानोबा चोले,माजी सरपंच त्र्यंबक वाव्हळ,माजी सरपंच आण्णासाहेब चोले,ऍड.संजय चोले,नारायण चोले,कॉं.बालासाहेब चोले,दत्तात्रय चोले,चंद्रसेन चोले,डॉ.रविकुमार मोरे,मनोज मोरे,श्रीकृष्ण चोले,अभिजीत वाव्हळ यांचे सह बहुसंख्य गावकरी महीला व पुरुष तसेच जिल्हा परिषद शाळा व जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.




