ताज्या घडामोडी
*आदर्श शिक्षक , वात्रटिकाकार भागवत मसने “प्रेरणादायी शिक्षक २०२५” या पुरस्काराने सन्मानित*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेल्फेअर पुणे, यांच्यातर्फे अंबाजोगाई शहरातील श्री योगेश्वरी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक तथा वात्रटिकाकार, कविवर्य भागवत मसने याना "प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार २०२५" देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार सन्मान सोहळा दि ९ रोजी पुणे येथे पदमजी हॉल पुणे येथे संपन्न झाला. हा पुरस्कार प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, (अण्णासाहेब मगर महाविद्यालय हाडपसर, पुणे) , प्राचार्य शेख आफताब(पूना कॉलेज पुणे) , इम्तियाज आगा (उपप्राचार्य पुना कॉलेज पुणे) तसेच सामाजिक कार्यकर्ते विलास लोंढे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भागवत मसने यांना यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये साहित्य, शैक्षणिक व सामाजिक पुरस्काराचा समावेश आहे.कोल्हापूर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय सन्मान, शिवजागर प्रतिष्ठाण चा महाराष्ट्र रत्न पुरस्कार, मैत्री फाउंडेशन बीडचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच आदर्श साहित्यिक पुरस्कार या पुरस्काराने भागवत मसने यांचा यापूर्वी सन्मान करण्यात आला आहे. भागवत रामकृष्ण मसने हे हिंदी विषयात एम ए बी एड असून त्यांना के. के. एम. कॉलेज मानवत येथे वाद विवाद स्पर्धेत मराठवाडा स्तरावरील स्पर्धेचे पहिले बक्षीस मिळाले. महाविद्यालयीन जीवनात वाद विवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा यामध्ये एकूण ३२ पारितोषिके मिळवली आहेत. एम ए हिंदी पूर्ण झाल्यानंतर श्री योगेश्वरी महाविद्यालय वरिष्ठ स्तरावर प्राध्यापक म्हणून सात वर्ष काम करताना अनेक विद्यार्थी वक्तृत्व वादविवाद स्पर्धेत घडवले. भागवत मसने यांनी स्वतः पाच एकांकिका व पाच गीते लिहून विद्यालयाच्या विद्यार्थी चमूद्वारे बीड आकाशवाणीवर सादर केले. मागील अनेक वर्षापासून विविध विद्यालय तथा महाविद्यालयात स्वतःचा हास्य व्यंगात्मक कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सादर केले आहेत. गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी वाद-विवाद व वक्तृत्व स्पर्धेचे उत्तम असे परीक्षण करत आहेत. त्याचबरोबर अनेक कवी संमेलनाचे उत्तम व बहारदार असे सुत्रसंचलन केरत आहेत. भागवत मसने यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होऊन शुभेच्छाचा वर्षाव केल्या जात आहे.




