ताज्या घडामोडी

जनतेच्या प्रश्नांसाठी सतत संघर्ष करणारे नेतृत्व – अशोक भाऊ गंडले

अंबाजोगाई | भरारी न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणारे, आंदोलनाला यशस्वी दिशा देणारे आणि सर्वसामान्यांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून अशोक भाऊ गंडले यांची अंबाजोगाईत ओळख निर्माण झाली आहे. अंबाजोगाई शहरातील आशिया खंडातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व अशोक भाऊ गंडले यांनी तेरा ( 13 ). दिवस आंदोलन करून यशस्वी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. तसेच अंबाजोगाई नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळावे, यासाठीही त्यांनी आंदोलन उभारून प्रशासनाला जागे करण्याचे काम केले. सातत्याने कामगार, नागरिक आणि उपेक्षित घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अशोक भाऊंची शहरात ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय तसेच विविध विकासात्मक कामांमध्ये सक्रिय असलेल्या अशोक भाऊंनी आपल्या कार्यशैलीतून जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या झंझावाती कार्यामुळेच वार्ड क्रमांक ५ मधून नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार म्हणून ते जनतेच्या पसंतीस उतरले आहेत. नगरसेवक म्हणून संधी मिळाल्यास गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवणे, विकासकामांना गती देणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध राहतील, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे. सामाजिक चळवळीतून उभे राहिलेले हे नेतृत्व नगरपरिषदेत पोहोचल्यास विकासाचा वेग निश्चितच वाढेल, अशी भावना अंबाजोगाईतील नागरिक व्यक्त करीत आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!